Shri Dasram Maharaj Kelkar

श्रीमामा महाराज

श्रीगोविंद अनंत तथा श्रीमामामहाराज केळकर यांचा अवतार पवित्र अशा केळकर कुळामध्ये श्रीअनंतराव व सौ.राधा यांचे पोटी फाल्गून शु १० शके १८१० या शुभ दिवशी शहापूर ग्रामी गोठाणामध्ये झाला. गोठाणामध्ये अवतरले म्हणून त्यांचे नाव 'गोविंद' असे ठेवण्यात आले. ते जन्मजात विरक्त हरिभक्त होते. देवाचे नामस्मरण करणे, भजन करणे, हेच त्यांचे लहानपणीचे छंद होते. संतदर्शनाची आवड ही त्यांना बालपणापासूनच होती.

पुढे वाचा

श्रीदासराम महाराज

श्रीराम गोविंद केळकर तथा श्रीदासराममहाराज हे जन्मजात ज्ञानी होते. कारण त्यांना भक्त प्रल्हादाप्रमाणे आईचे उदरातच अनुग्रह प्राप्त झाला होता. सौ.इंदिरादेवींना दासराममहाराजांचेवेळी गर्भवती असतानाच भ.स.तात्यासाहेबमहाराज कोटणीसांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. परमेश्वरी योजना, त्याचवेळी दासरामहाराजांनाही अनुग्रह प्राप्त झाला. त्यामुळे "गर्भी म्हणे सोहं सोहं | बाहेरी पडता म्हणे कोहं |" ही समर्थोक्ती दासराममहाराजांचे बाबतीत लागू होत नाही. ते सोहं साधनेतच अवतरले, आयुष्यभर तेच सोहंसाधन साधले व शेवटी सोहंस्वरुपाकार होऊन गेले. हेच त्यांचे खरे चरित्र आहे.

पुढे वाचा

श्रीअण्णा महाराज

प.पू.सदगुरू श्री चंद्रशेखर रामराय केळकर तथा श्रीअण्णामहाराज म्हणजे प.पू. सद्गुरू श्रीदासराममहाराज केळकर यांचे जेष्ठ चिरंजीव. यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५ (पांडवपंचमी) दि. २३-१०-१९४४ रोजी झाला.

पुढे वाचा

आजचे प्रवचन

श्री रामनिकेतन येथे नित्यशः जे विषय मांडले जातात ते ते विषय तिथीनुसार एका पानावर एक कीर्तन याप्रमाणे त्यांचे आकलनाप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एका पानात सारा विषय येऊ शकत नाही हे गृहीत आहेच, पण दुधाची तहान ताकावर का होईना निश्चित भागवता येणार आहे.

पुढे वाचा

आजचे कार्यक्रम

श्रीदासराममहाराज केळकर, सांगली यांना श्रुत झालेली कानडी पदे. ही पदे त्यांना भगवान सद्गुरू श्रीनिंबरगिकरमहाराज यांचे कडून, श्रीनिंबरगिकरमहाराजांनी देह ठेवल्यावर, नाद व प्रकाश रूपाने मिळाली.

पुढे वाचा

काही लोकप्रिय पुस्तके

समर्थ मानस

समर्थ मानस

Download
अधिकस्य अधिकम

अधिकस्य अधिकम

Download
प.पू.सद्गुरू श्रीतात्यासाहेबमहाराज कोटणीस चरित्र

प.पू.सद्गुरू श्रीतात्यासाहेबमहाराज कोटणीस चरित्र

Download
श्रीदासराममहाराजांचा वचन संग्रह

श्रीदासराममहाराजांचा वचन संग्रह

Download
परमार्थ प्रश्नोत्तरी

परमार्थ प्रश्नोत्तरी

Download
प. पू. सदगुरु श्रीमामामहाराज केळकर चरित्र

प. पू. सदगुरु श्रीमामामहाराज केळकर चरित्र

Download
अधिक पुस्तके

अभंगांचे व्हिडिओ

अधिक व्हिडिओ

कीर्तनाचे ऑडिओ

अधिक ऑडिओ