श्रीमामा महाराज
श्रीगोविंद अनंत तथा श्रीमामामहाराज केळकर यांचा अवतार पवित्र अशा केळकर कुळामध्ये श्रीअनंतराव व सौ.राधा यांचे पोटी फाल्गून शु १० शके १८१० या शुभ दिवशी शहापूर ग्रामी गोठाणामध्ये झाला. गोठाणामध्ये अवतरले म्हणून त्यांचे नाव 'गोविंद' असे ठेवण्यात आले. ते जन्मजात विरक्त हरिभक्त होते. देवाचे नामस्मरण करणे, भजन करणे, हेच त्यांचे लहानपणीचे छंद होते. संतदर्शनाची आवड ही त्यांना बालपणापासूनच होती.
पुढे वाचा
श्रीदासराम महाराज
श्रीराम गोविंद केळकर तथा श्रीदासराममहाराज हे जन्मजात ज्ञानी होते. कारण त्यांना भक्त प्रल्हादाप्रमाणे आईचे उदरातच अनुग्रह प्राप्त झाला होता. सौ.इंदिरादेवींना दासराममहाराजांचेवेळी गर्भवती असतानाच भ.स.तात्यासाहेबमहाराज कोटणीसांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. परमेश्वरी योजना, त्याचवेळी दासरामहाराजांनाही अनुग्रह प्राप्त झाला. त्यामुळे "गर्भी म्हणे सोहं सोहं | बाहेरी पडता म्हणे कोहं |" ही समर्थोक्ती दासराममहाराजांचे बाबतीत लागू होत नाही. ते सोहं साधनेतच अवतरले, आयुष्यभर तेच सोहंसाधन साधले व शेवटी सोहंस्वरुपाकार होऊन गेले. हेच त्यांचे खरे चरित्र आहे.
पुढे वाचा
श्रीअण्णा महाराज
प.पू.सदगुरू श्री चंद्रशेखर रामराय केळकर तथा श्रीअण्णामहाराज म्हणजे प.पू. सद्गुरू श्रीदासराममहाराज केळकर यांचे जेष्ठ चिरंजीव. यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५ (पांडवपंचमी) दि. २३-१०-१९४४ रोजी झाला.
पुढे वाचा
आजचे कार्यक्रम
श्रीदासराममहाराज केळकर, सांगली यांना श्रुत झालेली कानडी पदे. ही पदे त्यांना भगवान सद्गुरू श्रीनिंबरगिकरमहाराज यांचे कडून, श्रीनिंबरगिकरमहाराजांनी देह ठेवल्यावर, नाद व प्रकाश रूपाने मिळाली.
पुढे वाचा