श्री. रेवणसिद्धांपासुन श्री. मरुळसिद्ध उद्भवले. वीरशैव संप्रदायाचे जे रेवण, मरुळ इत्यादी पाच आचार्य आहेत ते सर्व वीरशैव संप्रदायातिल गोत्रप्रवर्तक आहेत.या पाच आचार्यानी वीरशैव संप्रदायाचा साक्शात्कारवाद प्रचारात आणला.श्री रेवणसिद्धांच्या पासुन तयार झालेली मंत्राक्रुती पाहुन हरी, हर,ब्रह्मदेव मोहित झाले.म्हणुन त्यांचे नाव 'मरुळ'. कानडीमध्ये 'मरुळ' या शब्दाचा अर्थ मोहित असा आहे.आपले अवतारकार्य पुर्ण झाल्यावर मरुळसिद्धानी आपल्या गुरुंच्या स्थानी म्हणजे रेणागिरीवर समाधी घेतली.उज्जनी(बेल्लारी जिल्हा)येथे श्री मरूळसिद्धांचा मठ आहे.श्री रेवणसिद्धांचा त्रेतायुगातिल मंत्राकार अवतार म्हणजे श्री मरुळसिद्ध.करवीर क्शेत्री माइने भिक्शापात्रात भिक्शा म्हणुन जहाल विष घातले. सद्गुरुस्मरण करुन ते विष त्यानी प्राशन केले. त्यांचा अधिकार पाहुन माया मोहित झाली म्हणुन मरुळसिद्ध हे नाव पडले.श्री मरुळसिद्धांच्या मठ परंपरेत शांतलिंग हे शांत साधु होऊन गेले.या संत शांतलिंगांचेच शिष्य क्रुष्णाप्पा व या क्रुष्णाप्पांचे शिष्य जयरामस्वामी वडगावकर होत.