श्री रेवणसिद्धानी माईचे मर्दन केले व नंतर करवीर भागातील अरण्यात त्यानी घोर तपश्चर्या केली म्हणून श्री रेवणसिद्धाना काडसिद्ध हे नाव प्राप्त झाले.पुढे हे श्री काडसिद्ध सिद्धगिरी येथे वास्तव्यास आले.तेथे त्यानी मठस्थापन केला.ते जेथे साधना करित तेथे वाघ व गाई एकत्र राहत.अर्थात अद्वैत साम्राज्य प्रस्थापित झाले होते.वाघावरबसून सापाचा चाबुक करून श्री मीरासाहेब(मीननाथ)हे त्यांचे दर्शनास आले असता श्री काडसिद्ध ज्या शिळेवर दंतधावन करित बसले होते ती शिळाच सरसर पुढे सरकु लागली.हे पाहताच श्री मीरासाहेब त्याना शरण आले.या श्री काडसिद्धांचाच सिद्धगिरी येथिल गुहेत भ. स. श्री निंबर्गीकर महाराजाना अनुग्रह प्राप्त झाला.साधनसिद्धीनंतर शरणागताना सिद्धसाधन सांगण्याची आज्ञा श्री काडसिद्धानी श्री निंबर्गीकर महाराजाना दिली.