भ.स.श्री निंबरगीकर महाराजांचा अवतार मिसाळकर यांचे कुळी मातुलग्रुही सोलापुर येथे चैत्र शुद्ध पौर्णिमा शके1712 रोजी झाला.वयाचे पाचवे दीवशी श्री काडसिद्ध महाराजानी जंगमवेशात महाराजाना मंत्रानुग्रह देवुन लिंगधारणा केली.यथावकाश सिद्धसाधनाने गुरुलिंगजंगम पदावर आरुढ होवुन महाराजानी साधन संप्रदायाची मुहुर्तमेढ रोवली.शरणागत मुमुक्शुना सिद्धसाधनाचा उपदेश केला.शिष्यांच्या शंकानिरसनार्थ ते प्रवचनही करीत.साधनाभ्यासाने महाराजांचे अनेक शिष्य सिद्ध पदास पोचले.चिमडचे रघुनाथप्रिय साधुमहाराज हे श्री महाराजांचे अधिकारी पट्ट शिष्य होत.परमेश्वरी इच्छेने आपले निर्धारीत कार्य पुर्ण झाल्यावर श्री महाराजानी निजधामास जाण्याचे ठरवीले.योग्य ती निरवानिरव करुन चिमडचे महाराजांचेकडे सर्व परमार्थ सोपवुन चैत्र शुद्ध 12 शके 1807 रोजी 'भजनपुजन साधुनी बळे'हा श्री तुकाराम महाराजांचा अभंग म्हणुन शिवस्मरणात महाराज शिवस्वरुप झाले.देह ठेवल्यावर 52वर्षानी श्री दासरा ममहाराजांचे शंकानिरसनार्थ श्री नागाप्पाण्णा महाराजांचे वचनाप्रमाणे श्री महाराजानी कानडीतुन बोध केला.श्री महाराजानी आपल्या हृदयातील कप्प्यातील कप्प्यातले श्री दासराम महाराजांचे हृदयात ओतले व द्वैत न मोडता श्री दासराम महाराजाना आपल्यासारखे केले. श्री महाराजानी जो बोध श्री दासराम महाराजाना केला तीच ही श्रीगुरुलिंगगीता.श्रीगुरुलिंगगीता हे महाराजांचे सगुण रुप आहे.