Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. अंबुराव महाराज

भ.स.श्री. अंबुराव महाराज

श्री. अंबुराव महाराजांचा अवतार दि.21/9/1856 रोजी श्रीक्शेत्र निंबरगीजवळील जिगजेवणी या खेडेगावी झाला.त्यांचे शालेय शिक्शण निंबरगी येथे झाल्याने बालपणीच त्याना अवतारी पुरुष भ.स. निंबर्गीकरमहाराज यांचे दर्शन झाले. महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने जीवाला प्रसन्नता हा प्रसाद प्राप्त झाला व श्रीअंबुराव महाराजांचे परमार्थाचा पाया रचला गेला.पुढे प्रापंचिक जीवनात प्रारब्धवशात आपत्तींचे डोंगरच त्यांचेवर कोसळले.अशा संसारदुःखे दुखावलेल्या त्रिविधतापे पोळलेल्या श्रीमहाराजाना श्रीभाऊसाहेबमहाराजानी त्यांचा निष्कपट साधाभोळा स्वभाव ओळखून बळेबळेच 1/9/30 रोजी नाम दिले.चित्त शुद्ध असल्याने तो बोध श्री. बाबानी लगेचच आत्मसात केला. अनुग्रह झालेल्या दिवसापासून नाम हेच श्री. बाबांचे सार सर्वस्व झाले.त्या नामालाच घट्ट पकडून ठेवून आपल्या कठोर साधनेच्या जोरावर आध्यात्म मार्गातील फार उच्च अवस्था प्राप्त करून घेतली. श्री.अंबुराव महाराजांची भक्ती पाहून 'तुझ्या भक्तीने मी धन्य झालो' असे धन्यतेचे उद्गार श्री. भाऊसाहेब महाराजानी काढले.त्याना नाम देणेची आज्ञा पण केली. श्री.भाऊसाहेब महाराजांचे निर्याणानंतर संप्रदायाची धुरा समर्थपणे सांभाळली.त्यानी ठिकठिकाणी नेमाचे सप्ते केले.सप्त्याचे निमित्ताने सांगलीला ते श्री.सीतारामबापू करंदीकर यांचेकडे येत असत.त्या निमित्ताने त्यांचेकडे जी प्रवचने होत त्या प्रवचनास श्री. दासराम महाराज केळकर लहान वयात जरीची टोपी घालून श्री. नानांचेबरोबर जात असत.त्याचे पारमार्थीक कार्य झाल्यावर 22/12/1933 पौष शु6 रोजी 'आमच्या सर्व वासना जळून गेल्या आता आम्ही नारायण नारायण म्हणत उडून स्वर्गात जाणार'हे वाक्य उच्चारून हा महात्मा नारायणरूप होवून गेला.