Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. नारायण महाराज यरगट्टीकर

भ.स.श्री. नारायण महाराज यरगट्टीकर

श्री.नारायण महाराज हे श्री.चिमड महाराजांचे द्वितिय चिरंजीव.त्यांचा अवतार चैत्र व. 14 शके1807रोजी झाला.भ.श्री.सद्गुरु निंबरगिकर महाराज हे त्यांच्या मातोश्री सौ माईसाहेब याना स्वप्नात दिसले व त्यानंतर ह्यांचा जन्म झाल्याने त्यांचे नाव 'नारायण'असे ठेवले.यथावकाश श्रीनारायणमहाराजाना श्रीलक्श्मीबाइअक्कांचे सांगणेवरुन त्यांचे चुलते श्रीबळवंतराव यरगट्टीकर यांचा अनुग्रह प्राप्त झाला. सद्गुरुंचे व श्रीलक्श्मीबाईअक्कांचे सान्निध्यात त्यानी कठोर साधना केली व श्रेष्ठ असे अनुभव प्राप्त करुन घेतले.जेष्ठ बंधु श्रीदाजीसाहेब यानी अवघ्या 19व्या वर्षीच निर्याण केल्याने श्री. नारायण महाराजाना त्यांच्या मनात नसतानाही वयाच्या 15व्या वर्षीच मठाधिपती व्हावे लागले.सद्गुरुक्रुपेने ही जबाबदारी त्यानी समर्थपणे पेलली.आपण मठपती नसुन साधुमहाराजांचे मठातील सेवेकरी आहोत.साधुमहाराज सर्व काही आपलेकडुन करवुन घेतात,अशी त्यांची भुमिका होती.गुरुक्रुपेने प्राप्त झालेले अनुभवाचे सत्य ज्ञान परखडपणे आपले प्रवचनातुन सांगत .'नारायणिय शिष्यप्रबोध'हे त्याच्या कीर्तनाचे संकलन वाचले असता आपणास सत्य ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही.रामनामात पवन साधणेचा अभ्यास आमचे श्रीमामामहाराजाना श्रीनारायणमहाराजांकडून प्राप्त झाला होता.त्यानी अखंडीत वाचेने श्रीराम स्मरण हे श्री. तात्यासाहेब महाराजांचे कीर्तन म्हणजेच श्री. नारायण महाराजांचे साधन अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळले.अहो साधन हेच नामसंकीर्तन आहे.अशा आत्मसाक्शात्कारी श्री.नारायण महाराजानी माघ शु.10 शके 1888 रोजी सायंकाळी श्रीसाधुमहाराजांचे मंदीराचे कळसाचे दर्शन घेवुन निर्याण साधले.