Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. तात्यासाहेब महाराज कोटणीस

भ.स.श्री. तात्यासाहेब महाराज कोटणीस

भ.स. श्री तात्यासाहेब महाराज कोट्णीस यांचा अवतार तेरदाळ येथे 07/11/1864 रोजी झाला.त्यांचे आईचे नाव रखमाबाई व वडीलांचे नाव पांडुरंग.जन्म होताच मातोश्रीना असणारी भुतबाधा नाहिशी झाली.ई.स.1873मध्ये त्यांचा व्रतबंध झाला.ई.स.1881मध्ये त्यांचा विवाह गदगकर यांची कन्या तुळसाबाई यांचेबरोबर झाला.मार्गशीर्ष वद्य 5 ई.स.1886 रोजी श्रीचिमड्महाराजांचा अनुग्रह् त्याना प्राप्त झाला.अंदाजे ई.स.1890मध्ये ते वकीलीची परिक्शा पास झाले व त्यानी सांगली येथे वकीलीचा व्यवसाय सुरु केला.श्रीचिमडचे महाराजांचे आज्ञेवरुन त्यानी ई.स.1900मध्ये सांगली येथे नित्यकिर्तनास सुरवात केली.अखंडीत वाचेने केलेले श्रीरामाचे स्मरण-सद्गुरु स्मरण हे त्यांचे कीर्तन जीवाशीवाची भेट घडविणारे मन सुखरुप शांत करणारे होते.सांगलीमध्ये अखंड 25 वर्षे हरिगुणनामाची लयलुट त्यानी केली.गर्भाचे आवडी मातेला डोहाळा लागुन आईचे निमित्ताने श्री दासराम महाराजाना गर्भात असताना श्रीतात्यासाहेबमहाराज यांचा अनुग्रह 1920 साली प्राप्त झाला.'सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला' हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वचनाचा प्रत्यय प्राप्त झाला.त्यांचे ठिकाणी साधन प्रक्रिया उमटली परिणामी ते लहानपणापासुनच साधन करित.आपले अवतार कार्य झाले की संत महात्मे हे एक क्शणही येथे रहात नाहित.'ब्रम्हपुरी आम्ही जातो रे कोणी येतो का रे ' असे कीर्तनातुन जाहिरपणे सांगुन हे महात्मे पौष वद्य6 ,27/1/1924 रोजी स्वरुपाकार झाले.पुढे माघ वद्य 3 1924 रोजी रात्री दासबोध पारायणाचे वेळी प्रगट होवुन आमचे श्रीमामाना नित्य कीर्तनाची आज्ञा दीली.कीर्तन रुपाने आजही ते आमच्यात आहेत.