Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. गोविंदपंत घोसरवाडकर महाराज

भ.स.श्री. गोविंदपंत घोसरवाडकर महाराज

भ.स.श्री. गोविंदपंत घोसरवाडकर यांचा अवतार कर्तिक शु.11 शके 1709 रोजी झाला.उपजतच त्यांचे ठिकाणी श्रीहालसिद्धनाथ यांची भक्ती होती.साहजिकच श्रीहालसिद्धनाथ त्यांचे हृदयात संचरून राहिले.वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांचे ठिकाणी देवाचा संचार होत असे.संचारावस्थेत ते जे बोलत ते सारे खरे होत असे.पण देवाची खरी ओळख होण्यासाठी संचारावस्थेत त्याना आदेश मिळाला की श्रीदत्तोपंत कुंभोजकर यांचेबरोबर चिमड येथे जा व गुरुपदेश घेवुन ये.आदेशाप्रमाणे श्रीगोविंदपंताना चिमडचे श्रीनारायणमहाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला.श्रीनारायणमहाराजाना अपत्य प्राप्ती झाली न्हवती,श्रीगोविंदपंतानी संचारावस्थेत 'महाराजाना मुलगा होइल 'असे सांगून ओट्यात नारळ घातला.त्याप्रमाणे पुढे वर्षाभरातच श्रीनारायणमहाराजाना मुलगा झाला.श्रीगोविंदपंत चंद्राक्कांचे निमित्ताने सांगलीला आले असताना आमचे घरी आले व त्याना संचार झाला,ते म्हणाले,'अखंडकीर्तन व नामस्मरणाने संप्रदायातील केळकरमामा आधिकारी पुरुष ठरतील'.संचारावस्थेत श्रीगोविंदपंताना आमचे श्रीदादा नमस्कार करण्यास गेले असताना ते म्हणाले,'तु मला नमस्कार करू नकोस,आमच्यात हा संचार प्रसंगाने होतो तुझ्यात हा संचार अखंड आहे'.श्रीगोविंदपंत हे संचाराबरोबर साधनाभ्यास करून सिद्धपदास पोचले.श्रीदासराममहाराज त्याना 10 वे नाथ असेच म्हणत.त्यानी सांगून सवरून आपल्या ईच्छेने देवाचा जप करताना पंचक संपल्यावर श्वासोश्वासी मनोव्रुत्तीचा निरोध साधून नामोच्चारणी स्वच्छंद प्रयाण केले.ते श्रीहालसिद्धरूप झाले.