Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. भाऊसाहेब महाराज उमदीकर

भ.स.श्री. भाऊसाहेब महाराज उमदीकर

श्री. भाऊसाहेब महाराज हे चिमडच्या श्रीरघुनाथप्रिय साधुमहाराज यांचे पट्ट शिष्य होते.त्यानी स्वतः कट्टाने रोज 9 तास नेम केला.तसाच तो शिष्यांचेकडून करवून घेतला. श्री. दासराम महाराजाना श्रूत झालेली श्री गुरुलिंगगीता त्यांचे वर्णन असे करते 'हिंचगिरीशा  भाऊराव गुर्वेशा,श्रीगुरुनामनिवासा,साधकेशा'ते हिंचगिरीशा श्रीगुरुनामनिवासा साधकेशा गुरुश्रेष्ठ होते.त्यानी श्री. गुरुदेव रानडे, श्री. सिद्धरामेश्वर व श्री.अंबुराव महाराज यांसारखे अधिकारी शिष्य निर्माण केले व त्यांचेमार्फत संप्रदाय खूप विस्तारविला.ते गावोगाव नेमाचे सप्ते करीत .तसाच तेरदाळ येथे नामाचा सप्ताह सुरु असताना आमचे श्री. मामामहाराज त्यांचे दर्शनासाठी गेले होते तेव्हा त्यानी श्री. मामाना केळ्याचा प्रसाद दिला व 'भक्तीचा थाट होइल 'असा आशिर्वाद दिला.त्यांचे आशिर्वादाप्रमाणे श्री. मामा महाराजांचे पुढील काळात भक्तीचा थाट झाला व ते हरिभक्तीचा कळस झाले.श्री. भाऊसाहेब महाराज त्यांचे  पारमार्थिक कार्य पुर्ण झाल्यावर माघ शु 3 शके 1835 रोजी हिंचगेरी येथे समाधीस्थ झाले.