Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. सिद्धरामेश्वर महाराज

भ.स.श्री. सिद्धरामेश्वर महाराज

श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अवतार सोलापुरजवळ पात्री गावी झाला. श्रीदेव सिद्धरामेश्वर यांचे सांगणेवरुन त्यांचे नाव सिद्धरामेश्वर असे ठेवण्यात आले.लहानपणापासुन त्याना परमार्थाची आवड होती.विजापुर येथे नोकरीचे निमित्ताने गेले असता त्याना श्रीभाउसाहेबमहाराजांचा अनुग्रह शनिवार असताना प्राप्त झाला,हे विषेश.एरवी श्रीभाउसाहेबमहाराज फक्त सोमवार व गुरुवारीच अनुग्रह देत. श्रीभाउसाहेबमहाराजानी असे गौरवोद्गार काढले की हा फार भाग्यवान पुरुष असुन तो जगाला ज्ञानप्रकाश देणार आहे.म्हणून त्याला आज शनिवारीच नाम देतो व याची आठवण म्हणून येथूनपुढे शनिवारी पण नाम देत जाईन.गुरुपदेशाप्रमाणे श्रीसिद्धरामेश्वरमाहाराजानी कट्टानी साधना करुन साक्शात्कार संपादन केला.त्यांचे प्रचितीचे बोलणे अंतरखुण बाणवणारे परिणामकारक असे .श्रीभाऊसाहेबमहाराजांचे आज्ञेने त्यानी लोकोद्धाराच्या कामास सुरवात  केली. श्रीगणपतरावमहाराज कन्नूर, श्रीनिसर्गदत्तमहाराज , श्रीकाड्सिद्धेश्वरमहाराज आदी त्यांचे शिष्य सिद्धपदास पोचले.श्रीसिद्धरामेश्वरमहाराजांची राहाणी फार वैभवशाली होती.त्यानी देवरुप सद्गुरु श्रीगुरुलिंगजंगमस्वामीमहाराज व श्रीभाऊसाहेबमहाराज यांचे वैभवात भरच घातली.ते अश्वीन वद्य 11 शके 1858 रोजी समाधिस्थ झाले.