Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. गुरुदेव रानडे

भ.स.श्री. गुरुदेव रानडे

श्रीदेव रामेश्वर क्रुपेने झालेला साक्शात नेमावतार म्हणजे श्री गुरुदेव रानडे.श्री भाऊसाहेब महाराजांचे क्रुपेने त्यानी सारे आयुष्यच साधनीभूत केले.अर्थात त्याना परमार्थातील श्रेष्ठ अनुभव प्राप्त झाले. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे प्रज्ञावंत संत होते.शालेय जीवनात जगन्नाथ शंकरशेठ शिष्यव्रुत्ती त्याना प्राप्त झाली. तर पार्मार्थीक जीवनात अनेक मर्मग्राही पुस्तकांचे लेखन त्यानी केले.त्यांचे आमचे श्री मामा महाराजांचेवर व श्री दासराम महाराजांचेवर विशेष प्रेम होते. सांगलीला आले व आमचे घरी आले नाहित असे कधीही झाले नाही.त्या तिघ्यांच्यात आत्मचर्चा नेहमीच होत.श्रीगुरुदेवांचे सांगणेवरुन श्रीमामानी त्यांचे एकट्यासमोर कीर्तन केले.श्रीगुरुदेव श्रीमामाना 'देवाकरता कीर्तन करणारे पुण्यपुरुष ' असे संबोधत तर श्रीगुरुदेवानी आमचे श्रीदादांचे श्रीज्ञानदेवतेहत्तीशीचे सार सांगणारे प्रवचन माळ बंगल्यावरील ध्यान मंदीरात सर्व साधकांसमोर करविले.त्यांचेकडून श्रीगुरुलिंगगीतेतील काही पदे ही म्हणवून घेतली.श्रीदादाना झालेल्या भ.स.श्रीनिंबरगीकरमहाराज यांचे दर्शनाबरहुकूम श्रीमहाराजांचा उभा फोटो संप्रदायात सर्वत्र लागावा अशी ईच्छाही व्यक्त केली.अशा श्रीगुरुदेवानी निंबरगी संप्रदायाचे नाव सर्वदूर पसरविले.आपले ठरलेले कार्य पुर्ण झाल्यावर श्रीगुरुदेवानी 6जून 1957 या दिवशी दशहार समाप्तीचे वेळी विठ्ठलनामाच्या गजरात देह ठेवला.