Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. दादा महाराज कोटणीस

भ.स.श्री. दादा महाराज कोटणीस

भ.स.श्री. दादा महाराज कोटणीस हे भ.स.श्रीतात्यासाहेब महाराज कोटणीस यांचे जेष्ठ व श्रेष्ठ चिरंजीव होत.संतांचे पोटी जन्म होणे ही मोठी भाग्याची गोष्ट असते.ते कीर्तनातून जाहिरपणे मोठ्याने अभिमानाने म्हणत 'भाग्ये आलो तुमच्या पोटा/झालो ब्रह्माडाहोनी मोठा//'.श्रीतात्यासाहेब महाराजांचे भाकिताप्रमाणे श्रीदादामहाराजानी श्रीतात्यासाहेब महाराजांचे निर्याणानंतर त्यांचा पारमार्थिक वारसा पुढे चालविला.त्यांचे निर्याणा नंतर त्यानी 'कैवल्य धाम'हे श्रीतात्यासाहेब महाराजांचे भव्य स्मारक उभे केले व त्या वास्तुत त्यांच्या सर्व स्म्रुती जतन करून ठेवल्या. त्यांच्या प्रथम पत्नी कै.सौ.जानकीवहिनी यांच्या त्यागातून ही भव्य वास्तू उभारली गेली. कै.सौ.जानकीवहिनी या आमचे श्रीदादाना मुलगाच मानायच्या. त्या श्रीमामाना म्हणाल्या की रामचे लग्नाचे देवक आम्ही ठेवणार.खरे पाहिले तर श्रीमामाना रामजी हा एकच मुलगा होता.त्याना आपण देवक ठेवावे असे वाटणे हे स्वाभाविक होते.पण ते म्हणाले तुम्हीच त्याचे खरे आई वडिल आहात,आपणच देवक ठेवा.पण तसा योग न्हवता. श्री हनुमान षष्ठीचा सोहळा प्रतिवर्षी मोठ्या थाटात श्रीदादामहाराज साजरा करीत.'कैवल्य धाम' येथे  श्रीतात्यासाहेबमहाराजांच्या पुतळ्याची स्थापना पैठणच्या श्रीभैय्यासाहेबमहाराज यांचे हातून झाली.त्यावेळी अनेक संत त्या कार्यक्रमास उपस्थित होते.त्यानी भाद्रपद शु.6 या दिवशी ईशचिंतनात निर्याण साधले.त्यांची समाधी  श्री तात्यासाहेब महाराज समाधी मंदीराचे प्राकारात दहनभुमीवरच बांधण्यात आली आहे.