Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. रघुनाथप्रिय साधु महाराज चिमड

भ.स.श्री. रघुनाथप्रिय साधु महाराज चिमड

श्री. रघुनाथप्रिय साधुमहाराज यांचा जन्म द्रविड देशात शके 1751 मध्ये झाला.लहानपणीच काही किरकोळ कारणावरुन घरातुन बाहेर पडले,ते परत घरी गेलेच नाहित.ते अजानबाहू वाचासिद्ध पुरुष होते. महायात्रेस जात असताना वाटेत निंबरगीजवळ सोनगी गावी त्यांचा मुक्काम होता.तेथे भजनाचा सप्ताह सुरु असताना भ.स.निंबरगीकर महाराजांची गाठ पडली.श्री साधुvमहाराजानी श्री महाराजांचा अधिकार ओळखुन त्यांचेकडून अनुग्रह घेतला.अगोदरच बाल ब्रह्मचारी व चांगल्या सुक्रुताचे हे पुरुष , त्यातच त्याना श्री महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला.अर्थात अल्पावधितच त्यानी श्री महाराजांचे क्रुपेने साधनसिद्धता साधली.श्री महाराजांचे क्रुपेने त्यांची किर्ती दिगंतरात पसरली.पुढे श्रीमहाराजांचे आज्ञेने त्यानी श्री चिमड्च्या महाराजाना व श्री भाउसाहेब महाराज उमदीकर याना अनुग्रह दिला.या दोघानी कट्टानी साधना करुन खरा परमार्थ लोकाना सांगितला.व श्री महाराजांचे नाव सर्वदूर पसरले.पुढे श्री साधुमहाराजांची वस्ती चिमड येथे गुराप्पा औरसंग यांचे घरी जाहली.तेथे राहुनच त्यानी लोकाना खरा परमार्थाचा मार्ग दाखविला.पुढे चिमड येथेच शालिवाहन शके 1801 चैत्र शु 3 या दिवशी श्रीसाधुमहाराजानी देह ठेवला.श्री साधु महाराज स्वरुपाकार झाले.पुढे श्री निंबरगीकर महाराज यांचे आज्ञेवरुन व श्री साधु महाराजांचे ईच्छेप्रमाणे श्री चिमड्महाराज आपली सुखाची नोकरी सोडून विट्याहून चिमड येथे पर्णकुटी बांधुन राहीले.तेथेच श्री साधु महाराजांचे मंदिर बांधत असताना गंगेसारख्या स्वच्छ शुभ्र पाण्याचा झरा लागला.श्री साधु महाराजांचे दर्शनाला गंगा आली आहे असे समजुन त्या विहिरीतच चतुष्कोणाक्रुती देवुळ बांधविले.त्या देउळात श्री काडसिद्धांचा बाण श्री निंबर्गीकर महाराजांची पिंडी,श्री साधु महाराजांच्या पादुका अशा त्रैमुर्तीची स्थापना मार्गशिर्ष वद्य7 शके 1803 रोजी श्री चिमडचे महाराजांचे हातून झाली.श्री. चिमड हे मोठे कैवल्यदायक महाक्शेत्र स्थान झाले.कार्तिक मासी पांडवपंचमी दिवशी मोठ्या थाटात रथयात्रा निघते.त्या वेळेची शोभा मोठी अवर्णनियच असते.