Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. चिमडचे महाराज

भ.स.श्री. चिमडचे महाराज

चिमड संप्रदायाचे प्रवर्तक श्री.चिमड्महाराज यांचा अवतार बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी गावी हुद्दार घराण्यात जेष्ठ शुद्ध10 शके 1755 रोजी झाला.त्यांच्या आईचे नाव सौ क्रुष्णाबाई तर वडिलांचे नाव त्रिम्बक. हुद्दार घराणे हे रामदासी घराणे होते.अर्थात घरातिल वातावरण पारमार्थिक स्वरुपाचे होते.घराण्यात दासबोध पठण व सज्जनगडची वारी करण्याची प्रथा होती.असेच एकदा सज्जनगडला गेले असताना त्याना हस्तलिखित दासबोध खुद्द श्री.रामदासस्वामिंचे हातुन प्राप्त झाला. आवश्यक ते व्यावहारीक शिक्शण झाल्यावर त्यांचा चौदाव्या वर्षी सौ सीताबाई यांचेशी विवाह झाला.परमार्थाची उपजत आवड असल्याने जत संस्थानमध्ये नोकरी करत असताना खरा परमार्थ समजुन घ्यावा म्हणून उमदी येथे असलेल्या साधु महाराजांचे दर्शनासाठी ते गेले.पण श्री साधु महाराजानी त्याना त्यांचे सद्गुरु श्री.निंबरगीकर महाराजांचेकडे मार्गदर्शनार्थ नेले.पण भ.स.निंबरगीकर महाराजानी अनुग्रह श्री साधु महाराजांचेकरवीच श्री चिमड महाराजाना दिला. श्री साधु महाराजांचे उपदेशाप्रमाणे त्यानी भरपूर साधन केले.दरवर्षी पौष महिन्यात महाराजांचे मार्गदर्शनाखाली साधन साधावे या हेतुने श्रीक्शेत्र निंबरगी येथे ते जात.श्री महाराजांचे क्रुपेने त्याना श्रेष्ठ असे चैतन्याचे अनुभव प्राप्त झाले.साहजिकच श्री. निंबरगीकर महाराजांची बहाल मर्जी श्री. चिमड महाराज यांचेवर बसली.पुढे भ.स.श्री साधु महाराजानी निर्याण साधल्यानंतर त्यांचे ईच्छेप्रमाणे व श्री. निंबरगीकर महाराजांचे आज्ञेप्रमाणे आपली सुखाची सरकारी नोकरी सोडुन त्यानी सांगितलेल्या जागी चिमड येथे पर्णकुटी बांधुन उपासना करून राहू लागले. तेथेच श्री साधुमहाराजांचे मंदिराचा पाया खोदताना निर्मळ गंगेसारखे पाणी लागल्याने विहिरीमध्येच मंदीर बांधले,त्यात श्री साधुमहाराजांच्या पादुका श्री निंबरगीकर महाराजांच्या नावाची पिंडी व श्री काडसिद्धांच्या नावाचा बाण या त्रैमुर्तीची स्थापना 1881 मध्ये श्री. चिमड महाराजांचे हातुन झाली. सन 1885 मध्ये भ.स.श्रीनिंबर्गीकरमहाराज श्री चिमड महाराजांचेकडे वंशपरंपरा सारा परमार्थ सोपवून स्वरुपाकर झाले.श्री चिमड महाराजानी श्री महाराजांची परमार्थाची परंपरा समर्थपणे सांभाळली.चिमडमध्ये राहुनच लोकाना पारमार्थीक मार्गदर्शन केले. आळंदी क्शेत्री मिळालेल्या निजधामास येण्याच्या सुचनेप्रमाणे त्यानी निजधामास जाणेचे ठरविले. तसे संकेत त्यानी अनेक प्रकारे दिले व मौन धारण करुन स्वरुपानुसंधानात शके 1813 मार्गशिर्ष शु.11 या दिवशी श्रीमहाराज स्वरुपाकार झाले.